गुटखा प्रकरणात पुन्हा तेच नाव; कारवाईचा धाक संपला का?

गुटखा प्रकरणात पुन्हा तेच नाव; कारवाईचा धाक संपला का?

पालघर | जावेद लुलानिया.

पालघर तालुका पोलीस ठाण्यात प्रतिबंधित गुटखा प्रकरणी पुन्हा एकदा गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, नागरिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित व्यक्तीचे नाव यापूर्वीही अशाच प्रकारच्या प्रकरणांत समोर आले होते.

महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना वारंवार त्याच प्रकारच्या प्रकरणांचा उलगडा होत असल्याने कायद्याचा धाक राहिला आहे का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.जर एखाद्या व्यक्तीविरुद्ध वारंवार गुन्हे दाखल होत असतील, तर त्यामागील संपूर्ण साखळी, पुरवठादार आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.

जनतेचा प्रश्न सरळ आहे गुन्हे दाखल होतात, माल जप्त होतो, पण या अवैध धंद्यांचे मूळ अद्याप संपुष्टात का येत नाही?

पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. यातीस देशमुख साहेब यांनी या प्रकरणात विशेष लक्ष घालून संपूर्ण नेटवर्कचा पर्दाफाश करावा, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
“गुटखा विक्रेते नव्हे, तर गुटखा साखळी उद्ध्वस्त झाली पाहिजे,” अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *