ठळक बातम्या

भिलाड रेल्वे स्थानकाजवळ भरूच मेमू ट्रेन रुळावरून घसरली; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज | PN24 NEWS

भिलाड रेल्वे स्थानकाजवळ भरूच मेमू ट्रेन रुळावरून घसरली; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

28.07.2026.

भिलाड

आज पहाटे भरूच–विरार मेमू (MEMU) प्रवासी रेल्वे भिलाड रेल्वे स्थानकाजवळ रुळावरून घसरल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, इंजिन व काही डबे रुळावरून खाली उतरल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. 

घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन, आरपीएफ आणि तांत्रिक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रेल्वे मार्ग पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, या घटनेमुळे काही गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही मोठी जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. अपघाताचे नेमके कारण रेल्वे प्रशासनाच्या चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे.

PN24 NEWS नागरिकांना विनंती करते की, रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत माहिती येईपर्यंत अफवांवर विश्वास ठेवू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *