ठळक बातम्या

    पालघर–मनोर रोडवरील मृत्यूचे खड्डे! चाहाडे नाका – कोकणेरा – नागझरी – बोईसर मार्गावरील रस्त्याची दुरवस्था; मोठ्या अपघाताची भीती, PWD कधी जागे होणार?

    पालघर–मनोर रोडवरील मृत्यूचे खड्डे! चाहाडे नाका – कोकणेरा – नागझरी – बोईसर मार्गावरील रस्त्याची दुरवस्था; मोठ्या अपघाताची भीती, PWD कधी जागे होणार?

    २७ जुलै २०२६ | सोमवार
    सकाळी ६:४५ वा.

    पालघर–मनोर रोड (NH-48 ला जोडणारा मार्ग) | चाहाडे,
    महाराष्ट्र – 401403 | 
    मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग NH-48 ला जोडणाऱ्या पालघर–मनोर रोडवरील चाहाडे नाका – कोकणेरा – नागझरी – बोईसर या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे.हा मार्ग सिंगल रोड असल्याने वाहनचालकांना खड्डे चुकवण्यासाठी वारंवार विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये जावे लागत आहे. त्यामुळे कधीही समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात होण्याची शक्यता स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत पालघर नागरिक | PN24 NEWS ने अनेक वेळा बातम्या प्रसिद्ध करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्यापही कोणतीही प्रभावी दुरुस्ती झालेली नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

    दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी, शालेय वाहने, रुग्णवाहिका आणि अवजड वाहने या मार्गावरून प्रवास करतात. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांची खोली वाहनचालकांना दिसत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे.स्थानिक नागरिकांचा थेट सवाल आहे – एखादा निष्पाप नागरिक जीव गमावल्यावरच प्रशासन जागे होणार का?या रस्त्यावर मोठा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग स्वीकारणार का?

    दरम्यान, BJP प्रणित नव भारतीय शिव वाहतूक संघटना, पालघर जिल्हाध्यक्ष जावेद मजीद लुलानिया यांनी इशारा देत सांगितले की,”वारंवार निवेदने, पाठपुरावा आणि बातम्या* करूनही प्रशासनाने या जीवघेण्या खड्ड्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे १ ऑगस्ट २०२६ रोजी या खड्ड्यांमध्ये मोठ्या संख्येने वृक्षारोपण करून अनोखे आंदोलन करण्यात येईल. प्रशासनाने त्याआधी तातडीने पालघर–मनोर रोडची दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील.”

    स्थानिक नागरिकांनीही सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने या मार्गाची पाहणी करून खड्डे बुजवावेत आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी केली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *