ठळक बातम्या

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त मनोर येथे महाआरती..

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त मनोर येथे महाआरती..

मनोर, पालघर. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त मनोर येथे विशेष महाआरतीचे आयोजन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य लाभावे तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही महाआरती आयोजित करण्यात आली.

बुधवार, दिनांक १० रोजी श्री राम मंदिर, बिरसायत भवन, मनोर, ता. जि. पालघर येथे हा कार्यक्रम पार पडला. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस संतोष जनाठे यांच्या उपस्थितीत तसेच स्वामी श्री भारतानंद सरस्वतीजी महाराज यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

यावेळी मंडळ अध्यक्ष हर्षद पाटील, विजय काळे, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी मोदी सरकारच्या विविध विकासकामांचा उल्लेख करत सरकारच्या १२ वर्षांच्या कार्याचा गौरव केला.कार्यक्रमात राष्ट्रहित, विकास आणि जनकल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला शुभेच्छा देण्यात आल्या. महाआरतीनंतर उपस्थितांनी देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *