ठळक बातम्या

वाढवण बंदराविरोधातील भूमिपुत्रांचा आक्रोश तीव्र; झाडतोडीला स्थानिकांचा रस्त्यावर उतरून विरोध.

वरोर येथे झाड तोडायला ग्रामस्थांचा जबरदस्त विरोध

वाढवण बंदराविरोधातील भूमिपुत्रांचा आक्रोश तीव्र; झाडतोडीला स्थानिकांचा रस्त्यावर उतरून विरोध.

तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी वाढवण बंदर प्रकल्पाच्या अनुषंगाने पाहणी दौरा केला. मात्र स्थानिक ग्रामस्थांच्या तीव्र विरोधामुळे त्यांना वाढवण येथे न जाता सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील चिंचणी गावातूनच पाहणी करावी लागली. अद्याप प्रकल्पाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू झालेले नसतानाही बंदराचे काम वेगाने सुरू असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे.

दरम्यान, आज दिनांक १ जुलै २०२६ रोजी पालघर प्रशासनाने झाडतोडीची प्रक्रिया सुरू करण्याचा प्रयत्न करताच स्थानिक भूमिपुत्र मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून विरोध दर्शवित असल्याचे दिसून आले. प्रशासनाकडून प्रकल्पाशी संबंधित प्रत्येक पुढील टप्पा राबविला जाईल, तसतसा स्थानिकांचा विरोध आणि आक्रोश अधिक तीव्र होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *