ठळक बातम्या

घराघरात जाऊन मतदारांचे मॅपिंग करा; BLO अधिकाऱ्यांना कडक सूचना

घराघरात जाऊन मतदारांचे मॅपिंग करा; BLO अधिकाऱ्यांना कडक सूचना

मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी 130 पालघर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. शेंडगे यांनी सर्व BLO (Booth Level Officer) यांना घराघरात जाऊन मतदारांचे मॅपिंग करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत एका ठिकाणी कॅम्प लावून काम करण्याऐवजी प्रत्येक BLO ने आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक घरी जाऊन मतदारांची पडताळणी व मॅपिंग करावे, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. पालघर जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघांमध्येही अशाच प्रकारच्या सूचना देण्यात येत आहेत.

दरम्यान, भाजप महाराष्ट्रचे चिटणीस श्री. संतोष आनंदी शिवराम जनाठे यांनीही जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि जागरूक मतदारांना आवाहन केले आहे की, जर आपल्या भागातील BLO घराघरात जाऊन मॅपिंग न करता एका ठिकाणी कॅम्प लावून काम करत असतील, तर त्याची माहिती संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावी.तसेच सर्व मतदारांनी BLO यांना सहकार्य करून आपले मतदार मॅपिंग व पडताळणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

पालघर नागरिक | जाग महाराष्ट्र न्यूज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *