पालघर नागरिक | विशेष वृत्त
जव्हार अर्बन बँकेच्या पालघर जिल्हा उपाध्यक्षपदी मुदस्सर पटेल यांची बिनविरोध निवड.
पालघर | दिनांक १८ ऑगस्ट २०२६.
प्रतिनिधी:अमीन मेमन.
कुडूस गावाचे लाडके उपसरपंच तसेच पालघर जिल्हा काँग्रेस युवा अध्यक्ष मा. श्री. मुदस्सर सरजी मोहम्मद हुसेन पटेल यांची जव्हार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या उपाध्यक्ष (व्हाईस चेअरमन) पदावर बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे कुडूससह पालघर जिल्ह्यातील त्यांच्या समर्थक, मित्रपरिवार आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.लहानपणापासूनच समाजसेवेची आवड असलेले आणि गोरगरीब, गरजू नागरिकांना निस्वार्थपणे मदत करण्यासाठी सदैव पुढे असलेले मुदस्सर पटेल यांना बँकेच्या महत्त्वाच्या जबाबदारीची संधी मिळाल्याने त्यांच्या सामाजिक व सार्वजनिक कार्याची दखल घेतली गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

जव्हार अर्बन बँकेच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना अधिक चांगली आर्थिक सेवा मिळावी, बँकेचा विस्तार व्हावा आणि ग्राहकाभिमुख कामकाजाला अधिक गती मिळावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. नव्या जबाबदारीच्या माध्यमातून परिसराच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी काम करण्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
मुदस्सर पटेल यांच्या निवडीबद्दल कुडूस ग्रामस्थ, मित्रपरिवार, सामाजिक कार्यकर्ते,बँकेचे संचालक, अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी पालघर नागरिक परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा!
पालघर नागरिक | PN24 NEWS



