कर्तव्याला सलाम… शौर्याला मानाचा मुजरा!

    कर्तव्याला सलाम… शौर्याला मानाचा मुजरा!

    पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख (IPS) यांना ‘शौर्य पदक’ जाहीर होणे ही केवळ त्यांच्या वैयक्तिक कामगिरीची दखल नसून संपूर्ण पालघर जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.गडचिरोलीसारख्या अतिसंवेदनशील भागात प्रतिकूल परिस्थितीत धैर्याने नेतृत्व करत त्यांनी आपल्या कर्तव्याची आणि राष्ट्रसेवेची वेगळीच छाप उमटवली. आज पालघरमध्येही त्यांचे नेतृत्व प्रामाणिकपणा, शिस्त, तत्परता आणि जनहिताची भावना यासाठी आदराने पाहिले जाते.

    एखादा अधिकारी मोठा होतो तो केवळ पदामुळे नाही, तर त्याच्या कर्तृत्वामुळे, निर्णयक्षमतेमुळे आणि सामान्य माणसाच्या मनात निर्माण झालेल्या विश्वासामुळे. यतिश देशमुख साहेबांच्या कार्यातून हीच भावना प्रकर्षाने जाणवते.त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी व अंमलदाराने जनतेच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करावे, यासाठी त्यांचे मार्गदर्शन प्रेरणादायी आहे.

    अशा धाडसी, कर्तव्यदक्ष आणि जनहिताला प्राधान्य देणाऱ्या अधिकाऱ्याला पालघरच्या जनतेचा मनःपूर्वक सलाम! 

     

    🏅पालघर नागरिक • जाग महाराष्ट्र • सतर्क पोलीस टाइम्स परिवारातर्फे

    श्री. यतिश देशमुख साहेबांना ‘शौर्य पदका’बद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!

    जय हिंद! 

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *