
पालघर पोलीस दलाचा गौरव! १५ अधिकारी व अंमलदारांना ‘अति उत्कृष्ट’ व ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पालघर पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी व अंमलदारांचा सन्मान
पालघर |
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पालघर पोलीस दलासाठी अभिमानाची आणि गौरवाची बातमी समोर आली आहे. पालघर जिल्हा पोलीस दलातील एकूण १५ पोलीस अधिकारी व अंमलदारांना त्यांच्या दीर्घकालीन, निष्ठावान आणि उत्कृष्ट सेवेसाठी भारत सरकार, गृह मंत्रालयाच्या वतीने ‘अति उत्कृष्ट सेवा पदक’ व ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर करण्यात आले आहे.
पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांच्या दीर्घकालीन आणि निष्कलंक सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘अति उत्कृष्ट सेवा पदक’ (२५ वर्षे सेवा) आणि ‘उत्कृष्ट सेवा पदक’ (१५ वर्षे सेवा) प्रदान करण्यात येते.
🏅 अति उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त अधिकारी व अंमलदार — २५ वर्षे सेवा
१. पोलीस उपअधीक्षक – रविंद्र सुभाष नाईक
पोलीस उपअधीक्षक (गृह), पालघर
२. पोलीस निरीक्षक – रणवीर प्रकाश बेंसे
मनोर पोलीस ठाणे (तत्कालीन नेमणूक)
३. पोलीस निरीक्षक – दत्तात्रेय बाजीराव फिंद्रे
वाडा पोलीस ठाणे (तत्कालीन नेमणूक)
४. पोलीस उपनिरीक्षक – रविंद्र बाबुराव वानखेडे
स्थानिक गुन्हे शाखा, पालघर
५. पोलीस उपनिरीक्षक – अनिल पांडुरंग दिघे
जिल्हा विशेष शाखा, पालघर
६. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक – प्रकाश महादू नवले
जिल्हा विशेष शाखा, पालघर
७. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक – किरण हरिश्चंद्र अंभिरे
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पालघर
उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त अधिकारी व अंमलदार — १५ वर्षे सेवा
१. पोलीस निरीक्षक – प्रदीप श्रीपती पाटील
स्थानिक गुन्हे शाखा, पालघर
२. पोलीस निरीक्षक – सुनील साहेबराव जाधव
बोईसर पोलीस ठाणे
३. पोलीस उपनिरीक्षक – विशाल राजेंद्र शिंदे
जनसंपर्क अधिकारी कार्यालय, पालघर
४. पोलीस हवालदार – दीपक शांताराम राऊत
स्थानिक गुन्हे शाखा, पालघर
५. पोलीस हवालदार – सचिन नारायण चौधरी
वाचक शाखा, पालघर
६. पोलीस हवालदार – पराग कमलाकर म्हात्रे
अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, पालघर
७. पोलीस हवालदार – नरेंद्र नाना पाटील
स्थानिक गुन्हे शाखा, पालघर
८. पोलीस हवालदार – दिनेश नामाजी गायकवाड
स्थानिक गुन्हे शाखा, पालघर

पालघर जिल्हा पोलीस दलातील या सर्व अधिकारी व अंमलदारांनी आपल्या सेवाकाळात निष्ठा, प्रामाणिकपणा, कर्तव्यदक्षता आणि उत्कृष्ट सेवा बजावत पोलीस दलाची प्रतिष्ठा उंचावली आहे. त्यांच्या दीर्घकालीन सेवेला मिळालेला हा सन्मान म्हणजे त्यांच्या कर्तव्यनिष्ठेची पावतीच मानली जात आहे.
याबद्दल पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री. विनायक नरळे यांनी सर्व पदकप्राप्त अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन करून त्यांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
१५ अधिकारी व अंमलदारांना मिळालेला हा सन्मान संपूर्ण पालघर जिल्हा पोलीस दलासाठी अभिमानाची बाब असून, त्यांच्या कर्तृत्वाला पालघरच्या नागरिकांकडून मनःपूर्वक सलाम!
जावेद मजीद लुलानिया
पत्रकार व समाजसेवक
माजी नगरसेवक, पालघर
साप्ताहिक पालघर नागरिक



