डहाणूतील न्यू लक्ष्मी ज्वेलर्स घरफोडीचा छडा; तीन आरोपी अटकेत, ५१ लाखांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने जप्त.

    डहाणूतील न्यू लक्ष्मी ज्वेलर्स घरफोडीचा छडा; तीन आरोपी अटकेत, ५१ लाखांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने जप्त.

     

    डहाणू | पालघर 22.08.2026.

     

    डहाणू येथील न्यू लक्ष्मी ज्वेलर्समध्ये झालेल्या धाडसी घरफोडी व दरोड्याच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात पालघर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ४२८.०५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, अंदाजे ₹५१ लाख ५१ हजार १५० रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

    २० जुलै २०२६ रोजी दुपारी न्यू लक्ष्मी ज्वेलर्समध्ये तीन अनोळखी व्यक्तींनी प्रवेश करून सोन्याचे दागिने जबरीने चोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दुकानदाराने प्रतिकार केला असता आरोपींपैकी एकाने गोळीबार केल्याचे पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे. आरोपींनी दुकानातील काचा फोडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, पालघर आणि डहाणू पोलिसांची स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली. गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत पोलिसांनी प्रथम यशवंत सदू चौधरी (वय ४०) याला २७ जुलै रोजी अटक केली. त्यानंतर तपासात निष्पन्न झालेल्या दिपेश यशवंत गवळी (वय २२) आणि विशाल चौरे (वय २३) या दोघांना १३ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली.

    तपासादरम्यान पोलिसांनी सोन्याचे दागिने जप्त केले असून, पुढील तपास सपोनि अंकुर शेलार, डहाणू पोलीस ठाणे यांच्या मार्फत सुरू आहे.या धाडसी कारवाईबद्दल पालघर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि डहाणू पोलिसांचे कौतुक होत असून, गुन्हेगारांवर पोलिसांनी केलेली ही कारवाई नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

    — पालघर नागरिक

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *