पालघर नागरिक फ्लॅश..
मुंबई:: कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षाचालकांनी रिक्षा रस्त्यावर थांबवत आंदोलन सुरू केल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.
गेल्या २० मिनिटांपासून लिंक रोडवरील वाहतुकीचा वेग मंदावला असून, प्रवाशांसह वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.प्रवासी घेऊन जाणाऱ्या काही ऑटो रिक्षाचालकांना धमकावल्याचा आरोपही करण्यात येत आहे. तसेच अमराठी रिक्षाचालकांकडून आंदोलन करत रस्ता अडवण्यात आल्याचा आरोप आहे.दरम्यान, घटनास्थळी वाहतूक पोलीस दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.



