📍पालघर
दिनांक : 26 ऑगस्ट 2025
आज मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी तर्फे पालघर जिल्ह्यात काढण्यात येणाऱ्या ईद-ए-मिलादुन्नबी (५ सप्टेंबर 2025) जुलूस संदर्भात अधिकृत परमिशन लेटर जिल्हा प्रशासनाला सुपूर्द करण्यात आले.
🤝 हा लेटर खालील विभागांना देण्यात आला:
पालघर जिल्हाधिकारी
पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक SP देशमुख साहेब.
ॲडिशनल SP श्री. विनायक नारडे साहेब.
DYSP पालघर श्री. विकास नाईक साहेब.
पोलीस निरीक्षक, पालघर पोलीस स्टेशन श्री. आनंद परड साहेब.
या वेळी प्रमुख पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते –जावेद लुलानिया, शोएब चना, एजाज खान, रेहान सय्यद, मुनाफ मेमन, अशरफ खान, ताहेर शेख, निलोफर मेमन, पार्वती गुरखा, वनिता बरड, अर्पिता तिवारी.
लेटर देताना प्रशासनाला आश्वासन देण्यात आले की –
जुलूस ५ सप्टेंबर रोजी शांततेत आणि अनुशासनाने काढण्यात येईल.
कुठलाही डीजे नसेल, स्वर-संवेदनशील गोष्टी होणार नाहीत.
जुलूसामुळे नागरिकांना त्रास होणार नाही, याची पूर्ण खबरदारी घेतली जाईल.
जबाबदार पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की कार्यक्रम अमन आणि भाईचारा याचा संदेश देईल.
जागोजागी खाण्याचे आणि पाण्याचे स्टॉल्स लावले जातील. त्याचीही काळजी घेण्यात येईल.
जिल्ह्यातील सर्व गावांच्या ट्रस्टी आणि कमिट्यांनी आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला लिखित माहिती द्यावी, जेणेकरून पोलीस प्रशासन योग्य सुरक्षा व्यवस्था करू शकेल.
💬 जावेद मजीद लुलानिया (उपाध्यक्ष – MDP महाराष्ट्र, माजी नगरसेवक, पालघर नगर परिषद) यांनी सांगितले :
👉 “हा जुलूस हा नबी ﷺ यांच्या प्रेमात आणि भाईचाऱ्याचा संदेश देणारा असेल. प्रशासनाला प्रत्येक पायरीवर सहकार्य केले जाईल. सर्व गावांच्या कमिट्यांनी पोलीसांना कळवावे, जेणेकरून सुरक्षा व बंदोबस्त निर्विघ्न राहील.”
📞 संपर्क : जावेद मजीद लुलानिया
📍 पालघर | 📱 8806247860
✨ विशेष सूचना:
👉 जुलूस काढताना जर कुठल्या ठिकाणी गणेश मंडळाचा उत्सव मार्गावर असेल तर त्यांचा पूर्ण मान राखून, जबाबदारीने व सलोख्याने जुलूस पुढे नेण्यात येईल



