ठळक बातम्या

    ऑक्टोबर रोजी जागतिक हात धुवा दिनानिमित्त पालघर जिल्ह्यात विविध जनजागृतीपर उपक्रम

    जिल्हा परिषद पालघर 

    ऑक्टोबर रोजी जागतिक हात धुवा दिनानिमित्त पालघर जिल्ह्यात विविध जनजागृतीपर उपक्रम

     

    हात धुण्याची योग्य पद्धत, कचरा वर्गीकरण आणि प्लास्टिकमुक्तीसाठी विशेष जनजागृती

    पजागतिक हात धुवा दिनानिमित्त १५ ऑक्टोबर रोजी पालघर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य उपकेंद्रे, शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नागरिकांमध्ये वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयी रुजविण्यासह हात धुण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी जिल्ह्यात व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी केले आहे.

    स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत दरवर्षी १५ ऑक्टोबर हा दिवस जागतिक हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त हात धुण्याची योग्य पद्धत, त्याचे आरोग्यदायी फायदे आणि दैनंदिन जीवनातील स्वच्छतेचे महत्त्व याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना हात धुण्याच्या योग्य पद्धतीचे मार्गदर्शन करणे, प्रत्यक्ष प्रात्यक्षिके घेणे, ग्रामस्तरावर जनजागृती करणे, समुदाय बैठका आयोजित करणे आणि शाळांमधून जनजागृती रॅली काढणे असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.यासोबतच घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०२६, कचऱ्याचे चार प्रकारांत वर्गीकरण, ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खतनिर्मिती आणि प्लास्टिकमुक्तीसाठी 3R (कमी वापर, पुनर्वापर आणि पुनर्चक्रण) या संकल्पनांबाबतही जनजागृती करण्यात येणार आहे. स्वच्छतेच्या सवयी दैनंदिन जीवनाचा भाग व्हाव्यात आणि नागरिकांचा या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग वाढावा, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.

    या उपक्रमांचे नियोजन संबंधित गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आणि बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी आपापल्या स्तरावर करावे. तसेच राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा सचित्र अहवाल जिल्हास्तरावर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.स्वच्छतेच्या चांगल्या सवयी अंगीकारणे, आरोग्यविषयक जागरूकता वाढविणे आणि स्वच्छ व निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी लोकसहभाग वाढविणे, हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे. जागतिक हात धुवा दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने उपक्रम राबवून नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करावी, असे आवाहन जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक अतुल पारसकर यांनी केले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *