पालघर शहर में खुलेआम गुटखा विक्री – क्या पाबंदी सिर्फ कागजों पर?

📍पालघर, दिनांक ०४/०८/२०२५
पालघर शहरात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही, अनेक भागात खुलेआम गुटखा विक्री सुरू आहे. हे पाहून असं वाटतं की प्रशासनाने घातलेली बंदी ही केवळ कागदोपत्री उरली आहे.
पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सतीश देशमुख यांनी यापूर्वी गुटखा विक्रीवर कडक पावले उचलण्याचे आदेश दिले होते. मात्र प्रत्यक्षात काही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही विक्री दिवसेंदिवस वाढताना दिसतेय.
🔸 गुटखा बंदी के आदेश फक्त फोटोसेशनपुरतेच का?
🔸 गलीगल्लीत खुलेआम गुटखा विक्री – पोलिसांना दिसत नाही का?
🔸 जर का नागरिकांनी 112 वर कॉल करून तक्रार केली, तरच कारवाई होते?
गुटखा माफियांशी काही अधिकाऱ्यांचे आर्थिक संबंध असल्याचा संशय नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळेच अनेक वेळा तक्रारी करूनही कुठलीही ठोस कारवाई होत नाही, असा आरोप देखील उघडपणे ऐकू येतोय.
👉 नागरिकांनी 112 हेल्पलाईनवर कॉल करून गुटखा विक्रीविरोधात तक्रार करावी – हीच एक जबाबदारीची पावले उचलण्याची वेळ आहे.
📢 प्रशासनाकडे मागणी – बंदी लावली आहे तर ती राबवलीही गेली पाहिजे. अन्यथा कायद्याचा वचक संपेल आणि गुन्हेगारीला खतपाणी मिळेल.
हिलसेल गुटके बाज व्यापारी..
मनोर – नाजीम भाई, सोहेल भाई,
पालघर – दिलावर भाई.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *