एनएच ४८, दिनांक: ४ ऑगस्ट २०२५
🔥 गाडीला आग लागली – मुंबई-अहमदाबाद हायवेवर भीतीचे वातावरण
आज सकाळी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग (NH-48) वर धावत्या गाडीला अचानक आग लागली. ही घटना ठाणे जिल्ह्यात पाटलीपाडा – फाउंटेन रोड भागात घडली. गाडीने अचानक पेट घेतल्यामुळे काही वेळातच आग विक्राळ झाली.
सुदैवाने गाडीतून प्रवासी सुखरूप बाहेर पडले अशी प्राथमिक माहिती आहे.
पोलिसांना त्वरित माहिती देण्यात आली असून, घटनास्थळी अग्निशमन दल पोहचले आहे.
🚧 या घटनेमुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे.
वाहनचालकांनी कृपया या मार्गाचा टाळावा व पर्यायी मार्गाचा वापर करावा.
🛑 ही माहिती – एन एच 48 माहिती ग्रुप द्वारे जनतेपर्यंत पोहचवण्यात येत आहे



