📍नवी दिल्ली, दिनांक 04/08/2025
ओबीसी आरक्षणासह नवीन प्रभाग रचनेनुसारच महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुका होणार
सुप्रीम कोर्टाने आज अत्यंत महत्त्वाचा निर्णय देत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मार्ग मोकळा केला आहे. या निर्णयानुसार राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका नवीन प्रभाग रचनेनुसारच व ओबीसी आरक्षणासह घेण्यात येणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे अनेक महिन्यांपासून रखडलेल्या निवडणुकांना चालना मिळणार असून, स्थानिक लोकशाही प्रक्रियेत आता नवा उत्साह निर्माण होणार आहे. मागासवर्गीय समाजाला न्याय देताना, त्यांच्या राजकीय सक्षमीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने या पार्श्वभूमीवर लवकरच निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता आहे.



