📍ठाणे स्टेशन, दिनांक ०४/०८/२०२५
Railway Alerts | दिव्यांग प्रवाशांसाठी मोठा दिलासा!
🚨 आज सकाळी ठाणे RPF व TTE/TCs यांच्या संयुक्त कारवाईत ठाणे स्टेशनवर 10 ते 12 लोकल गाड्यांमध्ये तपासणी करण्यात आली.
➡ 40-50 प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
➡ 10 महिला प्रवाशांवर विशेष लक्ष देऊन कारवाई केली गेली.
➡ सर्वात मोठी कामगिरी ठाणे स्टेशनने बजावली.
♿ विकलांग प्रवाशांचा आवाज.
1️⃣ ठाणे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वरील सीएसटी साइड विकलांग डब्बे पूर्णपणे अटेंड झाले.
2️⃣ RPF आणि महाराष्ट्र सुरक्षा बल यांचे दिव्यांग प्रवाशांकडून मनःपूर्वक आभार
3️⃣ रेल्वे TTE टीमचे सहकार्य उल्लेखनीय ठरले.
तथ्य., चर्चगेट–डहाणू लोकलमध्ये विकलांग डब्यांमध्ये सामान्य प्रवासी बिनधास्त बसतात.
➡ फर्स्ट क्लासमध्येही पासधारकांना जागा मिळत नाही.
👉 या बाबतही RPF व रेल्वे पोलिस अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी विकलांग प्रवाशांकडून करण्यात येत आहे.



