📍पालघर,
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कामगार सेना चिटणीस चेतन संखे आणि मा. शहर अध्यक्ष सुनिल राऊत यांच्या वतीने पालघर मधील मच्छी विक्रेत्या, भाजी विक्रेत्या गरजू नागरिकांना विनामूल्य छत्रीचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे अनावरण मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष सन्माननीय अविनाश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ठाणे शहर अध्यक्ष श्री. रवींद्र मोरे उपस्थित होते.
या कार्यक्रमात पालघर उपजिल्हाध्यक्ष रुपेश म्हात्रे, पालघर तालुका अध्यक्ष तथा केळवे ग्रामपंचायत सरपंच संदीप किणी, महाराष्ट्र कामगार सेना जिल्हाचिटणीस चेतन संखे, माजी पालघर शहराध्यक्ष सुनील राऊत सातपाटी शाखाध्यक्ष रितेश पागधरे, तसेच महाराष्ट्र सैनिक ऋषीं पाटील अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

या छत्री वाटपाच्या उपक्रमाचा मुख्य उद्देश गरजू लोकांना पावसाळ्यात आवश्यक असलेल्या छत्र्या प्रदान करणे हा असून मनसेच्या या सामाजिक उपक्रमामुळे स्थानिक समुदायात आनंद आणि समाधान निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे.
मनसेने नेहमीच समाजसेवेच्या कार्यात अग्रेसर राहण्याचा प्रयत्न केला आहे, आणि या उपक्रमाद्वारे त्यांनी एक नवा आदर्श स्थापित केला आहे. या छत्री वाटपामुळे गरजू लोकांना निसर्गाच्या प्रतिकूलतेपासून संरक्षण मिळेल.
सामाजिक बांधिलकी जपणारे असे उपक्रम निश्चितच प्रशंसेस पात्र आहेत आणि यामुळे समाजात एक सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत होते



