पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज.
पालघर गांधी नगर, पालघर नगर परिषद क्षेत्रातील गांधी नगर परिसरातील रस्त्यांची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. पावसामुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून नागरिकांना ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
या मार्गावरून ये-जा करताना विशेषतः आपल्या माता-भगिनींना, जेव्हा त्या लहान मुलांना घेऊन जातात, तेव्हा त्यांना धोक्याचा आणि गैरसोयीचा सामना करावा लागतो. ही अवस्था पाहून, छोटे-छोटे निरागस मुलं स्वतःच माती व दगड आणून खड्डे भरण्याचे काम करत आहेत.
ही घटना पालघर नगर परिषद आणि येथील नगरसेवकांसाठी अत्यंत लज्जास्पद आहे. नागरिकांच्या मुलभूत समस्या दुर्लक्षित करणाऱ्या प्रशासन आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींनी तरी आता तरी लाज वाटून कामाला लागावे, अशी स्थानिक नागरिकांची भावना आहे.
✍ जावेद मजीद लुलानिया
संपादक साप्ताहिक पालघर नागरिक.
संस्थापक – NH-48 इन्फॉर्मेशन ग्रुप
पालघर, महाराष्ट्र
📞 8806247860



