महामार्गाच्या वाहतूक कोंडीत अडकली… जखमी छाया गुरव यांचा दुर्दैवी मृत्यू

NH-48 इन्फॉर्मेशन ब्रेकिंग न्यूज – पालघर
तारीख: 11 ऑगस्ट 2025

📍पालघर

पालघर – सफाळे येथील मधुकर नगर परिसरात राहणाऱ्या छाया कौशिक गुरव यांच्या अंगावर झाड पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीच्या उपचारासाठी मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये हलविण्यात येत होते.

परंतु मुंबई–अहमदाबाद महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या दिशेला सकाळपासून प्रचंड वाहतूक कोंडी असल्याने अडथळा निर्माण झाला. वाहन तासन्तास एका जागी उभे राहिले, तीन ते चार तासांचा मोठा उशीर झाला. परिणामी, छाया गुरव यांची प्रकृती अधिकच बिघडली.

शेवटी त्यांना मिरा रोड येथील आर्बिट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र तेथे पोहोचण्यापूर्वीच खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी उपचार सुरू करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

ही घटना केवळ रस्त्यावरील दुरवस्था आणि वाहतूक व्यवस्थेतील ढिसाळपणामुळे घडली असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे.
रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष असलेल्या पालघरच्या जिल्हाधिकारी, तसेच समितीचे सदस्य असलेले खासदार यांनाही नागरिकांनी जबाबदार धरले आहे.

“योग्य वेळी रुग्णालयात पोहोचता न आल्याने एक जीव गमावावा लागला… ही फक्त वैयक्तिक हानी नाही, तर प्रशासनाच्या उदासीनतेचा थेट परिणाम आहे,” असे नागरिकांनी संतापाने सांगितले.

✍ जावेद मजीद लुलानिया
संस्थापक – NH-48 इन्फॉर्मेशन ग्रुप
पालघर, महाराष्ट्र
📞 880624786

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *