मनोर | ७ सप्टेंबर २०२५
✍ सोहेल खतीब, मनोर
ईद-ए-मिलाद (हजरत पैगंबर मोहम्मद ﷺ यांचा वाढदिवस) या पवित्र पर्वाच्या निमित्ताने ‘प्रॉफिट फॉर ऑल’ या अभियानांतर्गत मनोर फलाही तंजीम यांच्या पुढाकाराने रविवारी मोठ्या उत्साहात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.
“रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान” या संदेशाला अनुसरून शेकडो युवक व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या शिबिरात तब्बल १५२ युनिट रक्त संकलित झाले. रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
🌙 मान्यवरांची उपस्थितीया वेळी मनोर जामा मशीदचे इमाम, मुतवल्ली अमीर रईस, साजिद खतीब, मोमेज रईस उपस्थित होते.
🌹 उत्कृष्ट आयोजन व योगदानया शिबिराच्या यशस्वीतेसाठी फरुख पटेल, राहील हकीम, अवेश आवरी, सैबाज आवरी, शहाब पटेल, कैफ रईस, मझहर कोके यांचे विशेष प्रयत्न होते. आयोजक मंडळाने सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ व पाण्याचे वाटप करून स्वागत केले.
हा उपक्रम समाजातील मानवता, बंधुभाव आणि सेवाभाव यांचे सुंदर उदाहरण ठरला.
✨ आयोजक :
मनोर फलाही तंजीम.
मनोर सुंनी जमात



