ईद-ए-मिलादनिमित्त ‘प्रॉफिट फॉर ऑल’ अभियानांतर्गत रक्तदान शिबिर – २८५ युनिट रक्त संकलित
पालघर | ७ सप्टेंबर २०२५
ईद-ए-मिलाद (हजरत पैगंबर मोहम्मद ﷺ यांचा वाढदिवस) या पवित्र पर्वाच्या निमित्ताने ‘प्रोफेट फॉर ऑल’ या अभियानांतर्गत रविवारी पालघर जिल्हा मुस्लिम तंजीम संघटना, मस्जिद कमिटी व युवक कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर व मनोर येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.
“रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान” या संदेशाला अनुसरून मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पालघर येथे ४२ युनिट, तर मनोरच्या मदरशात तब्बल १५२ युनिट रक्त संकलित झाले. अशा प्रकारे एकूण २८५ युनिट रक्तदान झाले. शेकडो युवकांनी रांग लावून रक्तदान केले व रक्तदात्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
🌙 समाजासाठी आदर्श संदेश
ईद-ए-मिलाद हा पैगंबर मोहम्मद ﷺ यांच्या जीवनकार्याचा स्मरण दिन असून, त्यांनी नेहमी मानवतेचा, दयाळूपणाचा आणि समाजसेवेचा आदर्श दिला. त्या शिकवणीचा प्रत्यय पालघर व मनोरच्या रक्तदान शिबिरातून पुन्हा आला.
जातपात, भेदभाव यांच्या पलीकडे जाऊन मानवतेला सर्वश्रेष्ठ स्थान देणे हा इस्लाम धर्माचा मूलभूत संदेश आहे. या शिबिरातून मुस्लिम समाज नेहमीच शिक्षण, आरोग्य, सेवा व समाजहिताच्या उपक्रमांत आघाडीवर असल्याचे अधोरेखित झाले.
विशेष म्हणजे, तरुण वर्गाचा उत्साही सहभाग हे एक सकारात्मक चित्र ठरले.
हा उपक्रम केवळ धार्मिक नव्हता तर सामाजिक जाणिवा वाढवणारा ठरला. मुस्लिम समाजाच्या सेवाभावाची आणि देशासाठीच्या योगदानाची ठळक झलक नागरिकांसमोर आली.
✨ पालघर येथील आयोजक संघटना :
पालघर फलाही तंजीम
इनरव्हील क्लब ऑफ पालघर
एकदंत मित्र मंड



