पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज.
समुद्रकिनारी मोठा टँकर आढळला – पालघर जिल्हा.
शिरगाव,जुना सटपटी रोड – पालघर
दि. ७ सप्टेंबर २०२५, सायं. ५:०२ वा.
पालघर तालुक्यातील शिरगाव समुद्रकिनारी आज एक मोठा टँकर आढळून आला आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत उत्सुकता व्यक्त केली असून, हा टँकर नेमका कसा व कुठून आला याची माहिती मिळालेली नाही.
या टँकरचा तपास करण्यासाठी प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या वस्तू वाहून येण्याची ही पहिलीच घटना नसून, यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे..
रिपोर्टर.
अर्पिता तिवारी



