मनोर शहरात ईद-ए-मिलादुन्नबी जल्लोषपूर्ण साजरा | Manor, Palghar

📍 मनोर, पालघर | दिनांक: 5 सेप्टेंबर 2025

हुजूर पैगंबर साहेबांच्या 1500 वर्षांच्या जयंतीनिमित्त मनोर शहरात ईद-ए-मिलादुन्नबीचा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

चालू चौकातून जुलूस काढण्यात आला. या वेळी DySP मॅडम, मनोर पोलीस स्टेशनचे PI रणवीर बयेस व पोलीस कर्मचारी यांनी उत्कृष्ट बंदोबस्त ठेवून कार्यक्रम सुरळीत पार पाडला.

मनोरच्या जामा मस्जिदचे इमाम साहेब, मस्जिदचे मुतवल्ली आमिर रईस, सजिद खतीब, मोमेज रईस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

तसेच मनोर ग्रामपंचायतीचे सरपंच चेतन पाटील, मनीष भानुशाली आणि इतर सभासद यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर जुलूसातील मान्यवरांचे स्वागत करून पाणी वाटप केले. इमाम साहेब व मुतवल्ली यांचा व इतर मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

✨ या सर्व कार्यक्रमात मनोर पोलीस प्रशासनाने उत्तम व्यवस्थापन करून समाजामध्ये आदर्श निर्माण केला.

✍🏻 पालघर नागरिक रिपोर्टर : सोहेल खतिब.मनोर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *