भारतीय जनता पार्टी वाडा तालुका तर्फे ईद-ए-मिलादुन्नबी सणाच्या शुभेच्छा…

भारतीय जनता पार्टी वाडा तालुका तर्फे ईद-ए-मिलादुन्नबी सणाच्या शुभेच्छा…
पालघर नागरिक न्यूज सहसंपादक अमिन मेमन यांची बातमी…

दि.५/९/२०२५ रोजी पालघर जिल्ह्यातील नावाजलेले शहर म्हणून ज्याची ओळख आहे असे कुडूस शहर कुडूस शहर है 52 छोट्या छोट्या गावाचे मुख्य बाजारपेठ आहे व येथे आजूबाजूला जवळपास छोट्या-मोठे १२०० कारखाने आहेत कुडूस शहरामध्ये वेगवेगळ्या जातीची लोक गुण्यागोविंदाने राहतात गणेशोत्सव असो दिवाळी असो किंवा रमजान ईद व इतर सणांमध्ये एक दुसऱ्यांच्या घरी जाऊन शुभेच्छा देण्याची प्रथा गेल्या कित्येक वर्षापासून पारंपारिक रित्या चालत आलेली आहे तसेच आमच्या विभागातील मा. वाडा तालुका भारतीय जनता पार्टी अध्यक्ष मंगेश जी पाटील हे.

आपल्या परिसरातील सर्व धर्मीय समभाव राखण्याचे कार्य करीत असतात आज सुद्धा मुस्लिम धर्मीयांचा ईद मिलादुन्नबी हा पैगंबर मोहम्मद साहेबांचा वाढदिवसाचा मोठा सण असून या सणांमध्ये कुडूस परिसरातील नारे ,वडवली, वडवली कॅम्प येथे सुद्धा मिरवणूक काढली जाते व सर्वेकडे मोहम्मद साहेबांच्या नावाने जय जयकार केला जातो अशा या सणाप्रसंगी मा. मंगेश जी भोईर यांनी आपले सहकारी अमित शिर्के, कल्पेश पाटील, उत्तम चौधरी विनोद जाधव, व इतर सहकारी यांच्या जोडीला प्रत्येक ठिकाणी जाऊन मुस्लिम धर्मीयांना ईद-ए-मिलादुन्नबीच्या पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या मंगेश जी भोईर यांचे कार्य खूपच महान आहे जातीय सलोखा कायम राहावा यासाठी सुद्धा ते कायम प्रयत्नशील असतात प्रत्येक धर्म जातीच्या लोकांना एकत्र घेऊन चालतात मंगेश जी पाटील यांच्यासारखे नेतृत्व प्रत्येक तालुक्याला लाभले पाहिजे मंगेश जी पाटील यांचे व सहकाऱ्यांचे सुद्धा कुडूस, नारे, वडवली येथील मुस्लिम बांधवांनी स्वागत केले व आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *