पालघर पोलीस विभागास हार्दिक अभिनंदन

📍 पालघर | दिनांक: 5 सेप्टेंबर 2025

ईद-ए-मिलादुन्नबी जुलूस २०२५ हा शांततेत, सुरळीत व शिस्तबद्ध पार पडला. या निमित्ताने पालघर पोलीस प्रशासनाने केलेल्या उत्कृष्ट बंदोबस्ताबद्दल आम्ही मनःपूर्वक आभार मानतो.

सुन्नी जामा मशीदेतून जुलूसाची सुरुवात माननीय पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. यतीश देशमुख साहेब, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री. विनायक नारळे साहेब आणि पालघर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. आनंद परड साहेब यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

हा जुलूस हुज़ूर गुलज़ारे मिल्लत हज़रत अल्लामा पीर गुलज़ार अहमद साहेब नुरी यांच्या ज़ेरे-सदारतीत, तसेच सुन्नी जामा मशीद पालघरचे ट्रस्टी हज़रत मौलाना साहेब यांच्या सरपरस्तीमध्ये पार पडला.


लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. गावातील सर्व समाजघटकांनी मान्यवरांचे स्वागत केले आणि ईद-ए-मिलादच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यामुळे संपूर्ण पालघर जिल्ह्यात बंधुभाव, ऐक्य आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले.


मी, जावेद मजीद लुलानिया, या ठिकाणी माननीय एस.पी. साहेब, अतिरिक्त एस.पी. साहेब, पोलीस निरीक्षक साहेब व त्यांच्या संपूर्ण पोलीस विभागाचे तहेदिल से आभार व्यक्त करतो. आपल्या योगदानामुळे आज पालघर जिल्ह्यात आनंद, शांतता व सुरक्षितता नांदत आहे.

दिनांक : ५ सप्टेंबर २०२५

✍ जावेद मजीद लुलानिया.
उपाध्यक्ष – मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (MDP), महाराष्ट्र.
माजी नगरसेवक, पालघर नगर परिषद.

📍 राहणार : पालघर, जिल्हा पालघर
📞 880624786

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *