पालघर शहरात पुन्हा अवैध धंद्यांचेउधाण प्रशासन गप्प!*

*📰 पालघर शहरात पुन्हा अवैध धंद्यांचेउधाण प्रशासन गप्प!*

 

दिनांक: ९ ऑगस्ट २०२५ |

 

*पालघर शहरात पुन्हा अवैध धंद्यांना जोर आलेला दिसत आहे. गुटखा बंदी असूनही परबसह सर्वत्र खुलेआम गुटखा विक्री होत आहे. त्याचप्रमाणे गांजा व गर्दा विक्री, मटका आणि क्रिकेट बेटिंग हे धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहेत.

 

काही दिवसांपूर्वीच मनोर येथे एक संपूर्ण गाडी गुटख्याची चोरीला गेली होती. गुटखा वाहणाऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे, मात्र अजूनही गुटखा चोर व चोरीचा गुटखा दोन्हीही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईबाबत नागरिक शंका उपस्थित करत आहेत.

 

स्थानिक नागरिकांचा सवाल असा आहे की, आपली सुरक्षा आता आपणच करायची का? कारण पोलिस प्रशासन व स्थानिक यंत्रणा पूर्णतः शांत आहेत. विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा परिसरातही अशीच परिस्थिती आहे.

नागरिकांचा संताप असा आहे की, जर आपण खासदार-आमदार असतो तर प्रत्यक्ष जाऊन हे धंदे बंद केले असते. पण सध्याचे खासदार-आमदार फक्त स्वतःच्या प्रसिद्धीपुरते काम करत आहेत, नागरिकांच्या अडचणींकडे पूर्ण दुर्लक्ष केले जात आहे.

माननीय पालघर जिल्हाधिकारी साहेबा, हा सर्व प्रकार आपल्या जबाबदारीत येतो. मग अजूनही कारवाई का होत नाही, हा प्रश्न पालघरकर विचारत आहेत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *