पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज
दिनांक : १६ सप्टेंबर २०२५
मुंबई गुन्हे शाखा कक्ष-९२ कडून अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, “९०८/९०९ वेस्टर्न प्राईड, विहार कॉर्पोरेट कॉलनी, वेस्टर्न एक्सप्रेस रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई” येथे बेकायदेशीर कॉल सेंटर सुरु असून, त्यामध्ये अमेरिकन नागरिकांना Greeksquad व Mac cafee हे आंतरराष्ट्रीय रिमोट टूल्स वापरून बनावट तांत्रिक मदत दिल्याचे सांगून फसवले जात होते. संबंधित ठिकाणी EYEEM या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने पीडितांच्या संगणकातील फोटो काढले जात होते व त्यातूनच अमेरिकन नागरिकांची फसवणूक होत होती.

या फसवणूक प्रकरणात अमेरिकन नागरिकांकडून २५० ते ५०० डॉलर्स इतकी रक्कम ऑनलाइन ट्रान्सफर करवून घेतली जात होती.
☑ या कारवाईतून ९ कॉल सेंटरमधील १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
☑ ठिकाणावरून ९० लॅपटॉप, २० मोबाईल फोन, २ वाहनं, ९० टेलिफोन लाईन्स व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
☑ ही कारवाई मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष-९२ कडून करण्यात आली असून, गुन्हा क्र. ३९६/२०२४ अन्वये १३ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संपूर्ण कारवाईत पोलिस आयुक्त, अतिरिक्त पोलिस आयुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्त यांच्यासह गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी महत्वाची भूमिका बजावली.
टीप : अशा प्रकारच्या बेकायदेशीर कॉल सेंटरच्या ॲक्टिव्हिटी पालघरमध्येही काही काळापूर्वी सुरु होत्या. त्यामुळे नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे.
👉 पालघर नागरिक



