पलघर जिल्ह्यात आज मुसळधार पावसामुळे न्यू ताल बिट्स व दांडिया बिट्स कार्यक्रम तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहेत

पालघर नागरिक अलर्ट.

न्यूजदिनांक: 28 सप्टेंबर 2025

पलघर जिल्ह्यात आज मुसळधार पावसामुळे न्यू ताल बिट्स व दांडिया बिट्स कार्यक्रम तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहेत. प्रशासन आणि हवामान खात्याने पालघर जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. आमदार राजेंद्र गावित यांनी नागरिकांना घरातच सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. पावसामुळे जलभराव, विजेची तारे तुटणे, झाडे पडणे आदी आपत्कालीन घटना घडू शकतात.नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि अफवांपासून सावध राहावे. अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे व संकटाच्या प्रसंगी हेल्पलाइनवर संपर्क

साधावा.महत्वाची माहिती
प्रशासनाकडून उद्या,
29 सप्टेंबरला, सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी अधिक माहितीकरिता संबंधित शाळांशी संपर्क साधावा. प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व उपाययोजना करत आहे.आमदार राजेंद्र गावित हे पालघर जिल्ह्याच्या नागरिकांसाठी सदैव पुढाकार घेणारे नेते आहेत. संकटाच्या वेळी ते सदैव नागरिकांच्या सुखदु:खात सहभागी होतात आणि मदतीस पुढे येतात. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन आणि विभाग कार्यरत असून, लोकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न शक्य केले जात आहेत. आमदार गावित यांचा सतत सक्रिय राहण्याचा आणि जनतेच्या हितासाठी काम करण्याचा संकल्प खूपच प्रशंसनीय आहे.पालघर जिल्ह्याच्या सुरक्षेसाठी प्रशासन सतर्क असून नागरिकांनी सहकार्य करावे ही विनंती.

पालघर नागरिक संपादक
जावेद लुलानिया, पालघर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *