पालघर कचेरी रोड आंदोलन यशस्वी. 24.12.2025.

पालघर कचेरी रोड आंदोलन यशस्वी. 24.12.2025.

30 डिसेंबरपासून रस्ता दुरुस्ती सुरू होणार
पालघर (प्रतिनिधी) :

पालघर शहरातील कचेरी रोड पाच बत्ती येथील रस्त्याच्या दयनीय अवस्थेविरोधात आज नागरिकांच्या वतीने करण्यात आलेले शांततापूर्ण आंदोलन अत्यंत शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पडले. या आंदोलनात कोणताही रस्ता अडविण्यात आला नाही, कोणताही वाहतूक कोंडीचा प्रकार झाला नाही तसेच सामान्य नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ दिला गेला नाही.


या आंदोलनावेळी पालघर पोलीस प्रशासन व पालघर नगरपरिषद प्रशासनाचे अधिकारी प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित होते. प्रशासनासोबत झालेल्या चर्चेनंतर पालघर नगरपरिषदेने दिनांक 30 डिसेंबर 2025 पासून कचेरी रोडवरील रस्ता दुरुस्तीच्या कामास सुरुवात करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले आहे. त्यामुळे नागरिकांची प्रमुख मागणी पूर्ण झाल्याने आंदोलन समाधानकारक पद्धतीने समाप्त करण्यात आले.


या संपूर्ण आंदोलनात पालघर पोलीस विभागाने अत्यंत संवेदनशील, समजूतदार व जबाबदारीने भूमिका घेतली. मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देत, परिस्थिती पूर्णतः शांततेत हाताळण्यात आली. याबद्दल पालघरचे माननीय पोलीस अधीक्षक श्री. यतीस देशमुख साहेब, पालघर DySP मॅडम, पालघर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अनंत पराड साहेब, तसेच गोपनीय विभागाचे सुयोग साहेब आणि संपूर्ण पोलीस दलाचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत.


खरंच, पोलीस हे जनतेचे खरे रक्षक आहेत, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.


या आंदोलनात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी खांद्याला खांदा लावून साथ देणारे हर्बल सिंग नन्नाडे उर्फ पप्पू भाई, निलेश विचारे. सहकारी कामगार नेते श्री आनंद सावंत साहेब, मयंक बचपय जी, अब्दुल रहमान, वनिता बरड, अर्पिता तिवारी, शबनम शेख, शबाना शेख तसेच अनेक कार्यकर्ते व समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिस्त, संयम आणि कायदेशीर मार्गाने केलेले आंदोलन हेच लोकशाहीचे बळ असल्याचे आजच्या आंदोलनातून पुन्हा सिद्ध झाले आहे.

जावेद म. लुलानिया, पालघर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *