पालघर नगरपरिषद वॉर्ड क्रमांक १ मध्ये *गटार-नाल्यांच्या कामाची तयारी सुरू; नगरसेवक आरिफ कलाडिया मैदानात उतरले.

पालघर नगरपरिषद वॉर्ड क्रमांक १ मध्ये *गटार-नाल्यांच्या कामाची तयारी सुरू; नगरसेवक आरिफ कलाडिया मैदानात उतरले.

पालघर शहरातील वॉर्ड क्रमांक १ – गांधीनगर, डुंगीपाडा (रझा नगर) परिसरात गटार व नाल्यांच्या साफसफाईच्या कामाची तयारी सुरू करण्यात आली असून, स्थानिक नगरसेवक आरिफ भाई कलाडिया यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून कामाला सुरुवात केल्याचे चित्र दिसत आहे. परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी लक्षात घेऊन ही पावले उचलण्यात आली आहेत.

गांधीनगर व डुंगीपाडा परिसरातील गटार-नाले मोठ्या प्रमाणात घाण, कचरा व साचलेल्या पाण्यामुळे भरलेले असून, त्यांची तातडीने साफसफाई होणे अत्यंत गरजेचे होते. आरिफ भाई कलाडिया यांनी ही समस्या गांभीर्याने घेत अतिशय समजदारीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने कामाची सुरुवात केली आहे. स्थानिक रहिवाशांमध्ये या निर्णयाचे स्वागत होत आहे.


या परिसरातील सर्वात मोठी समस्या पिण्याच्या पाण्याची आहे. नागरिकांना दुपारनंतरच पाणी मिळते. ही बाब लक्षात घेऊन नगरसेवक आरिफ भाई यांनी नगरपरिषदेला लेखी पत्र देऊन सकाळी ८ ते 10 वाजेपर्यंत नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी ठोस मागणी केली आहे. हा परिसर अत्यंत वंचित, झोपडपट्टीचा असल्याने मूलभूत सुविधांची नितांत गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.


आरिफ भाई कलाडिया यांच्या पुढाकारामुळे गांधीनगर परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि सुव्यवस्थित होण्याची आशा निर्माण झाली आहे. परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवरही कायद्यानुसार तातडीची कारवाई केली जाईल, असे संकेत देण्यात आले आहेत. या संपूर्ण कामकाजाचे फोटो व व्हिडिओ उपलब्ध असून, प्रत्यक्ष काम सुरू झाल्याने नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
✍️
— पालघर नागरिक | प्रतिनिधी वनिता बरंड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *