पालघर नागरिक स्पेशल न्यूज.
रस्ता आधा, अतिक्रमण पूर्ण पालघर नगरपरिषदेच्या काँक्रीट रस्त्याला भ्रष्टाचाराचा वास!
☄️अतिक्रमण हटवायचे सोडून काँक्रीट रस्ता?
☄️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक–नीलसृष्टी रोडवर उघड भ्रष्टाचाराचा आरोप..

पालघर |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते नीलसृष्टी अपार्टमेंट दरम्यान सुरू असलेल्या काँक्रीट रस्त्याच्या कामावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण रस्ता काँक्रीट करण्यापूर्वी हटवायची असलेली अतिक्रमणे अजूनही जैसेच्या तसेच उभी आहेत, तरीही पालघर नगरपरिषदेच्या माध्यमातून घाईघाईने काम सुरू करण्यात आले आहे.
जगदंबा हॉटेलजवळील केनम स्कूलच्या भिंतीलगत अवैध अतिक्रमण असून त्या बाजूला उघडी गटार आहे.
नियमांनुसार, अशा ठिकाणी आधी अतिक्रमण हटवून भुयारी ड्रेनेज (गटर) करणे आवश्यक आहे, त्यानंतरच काँक्रीट रस्ता केला जाऊ शकतो. मात्र येथे नियमांना बगल देत थेट काँक्रीट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
याच रस्त्यावर पुढे रिलायन्स मॉल परिसरातही अतिक्रमण कायम आहे, तर दुसरीकडे फीलिया हॉस्पिटल ते गणेश कुंड या भागात अर्धवट काँक्रीटीकरण करण्यात आले असून उर्वरित रस्ता तसाच सोडून देण्यात आला आहे. त्यामुळे हा रस्ता नव्याने केला जातो आहे की केवळ निधी खर्च दाखवला जातो आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की,
👉 “हे नियोजन नसून उघड भ्रष्टाचार आहे. अतिक्रमण हटवले नाही, ड्रेनेज नाही, रस्ता अर्धवट – तरीही कोट्यवधींचं काम दाखवलं जात आहे.”
नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, अशा पद्धतीचे बेकायदेशीर व अपूर्ण काम आम्ही कदापि सहन करणार नाही आणि याला तीव्र विरोध केला जाईल.
मागणी स्पष्ट आहे
✔️ आधी सर्व अतिक्रमण हटवावे.
✔️ भुयारी गटार व ड्रेनेज पूर्ण करावी.
✔️ त्यानंतरच संपूर्ण आणि दर्जेदार काँक्रीट रस्ता करावा.
✔️ अन्यथा या कामाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
✍️ पालघर नागरिक
(जनतेचा आवाज)
महाराष्ट्राच्या निर्भीड, वास्तव, सडेतोड बातम्या फक्त आपल्या
पालघर नागरिक पोर्टल वर मुख्य संपादक:- ✒जावेद लुलानिया
पालघर नागरिक ला आवश्यक भेट द्या आणि राह अपडेट
जाहिराती साठी संपर्क करा.
Editor- Javed Lulania
Contact Number- 88062 47860



