26 जानेवारी 2026 रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित आदिवासी एकता मित्र मंडळ, बिरसायत संचलित शिवध्येय अकॅडमी च्या वतीने ध्वजारोहणाचा कार्यक्रम मनोर बिरसायत भवन येथे आयोजित केला होता.
संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री सुरेश खांडेकर यांचा हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, तद्नंतर कच्छ युवक संघ यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले त्यात शेकडो युवक,युवती,महिला पुरुष नागरिकांनी रक्तदान केले.
सदर दोन्ही कार्यक्रमात लोकप्रतिनिधी, मान्यवर ,नागरिक यांनी मोठ्या संखेने उपस्थिती दर्शविली.बिरसायत परिवार व आदिवासी एकता मित्र मंडळाचे कार्यकर्ते यांनी मोठ्या उत्साहात कार्यक्रम यशस्वी करण्यास मेहनत घेतली.
आपला
संतोष शिवराम जनाठे
बिरसायत परिवार








