पालघर नागरिक ब्रेकिंग क्राईम न्यूज अलर्ट.
दिनांक : 27.01.2026
मीरा रोडमध्ये बॅन गुटख्यावर मोठी कारवाई; MBVV क्राइम ब्रांच युनिट-1 ची धडक रेड.
मीरा रोड | रिपोर्ट : बॅनु वर्गीस
मीरा रोड परिसरात बेकायदेशीर गुटखा विक्री व वाहतुकीविरोधात MBVV पुलिस क्राइम ब्रांच युनिट-1 यांनी मोठी कारवाई करत बॅन गुटख्याचा साठा पकडला आहे. काशीगाव पोलीस स्टेशन हद्दीत करण्यात आलेल्या या रेडमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा वाहून नेणाऱ्या दोन लग्जरी चारचाकी वाहनांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी सुमारे ₹25 लाख रुपये किमतीचा बॅन गुटखा जप्त केला आहे. ही संपूर्ण कारवाई DCP राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सध्या DCP (Crime) यांचा चार्ज MBVV झोन-1 कडे असल्याने या प्रकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास क्राइम ब्रांचकडून सुरू असून, गुटखा पुरवठा साखळीमागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेतला जात आहे.

या कारवाईसंदर्भातील फोटो व व्हिडिओ उपलब्ध असून, त्यामध्ये जप्त करण्यात आलेली वाहने व बॅन गुटख्याचा मोठा साठा स्पष्टपणे दिसत आहे. या रेडमुळे गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली असून, MBVV पोलीस प्रशासनाने बॅन गुटख्याविरोधात कडक भूमिका घेतल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
❓ मात्र, आता मोठा प्रश्न उपस्थित होत आहे — पालघर जिल्ह्याचे काय?
मीरा रोडमध्ये अशा ठोस कारवाया होत असताना पालघर जिल्ह्यात गुटख्याचा अवैध व्यापार अजूनही धडाक्याने सुरू असल्याचे चित्र आहे. झोपडपट्टी परिसर, हायवे लगतची दुकाने व काही ठरावीक भागांमध्ये बॅन गुटखा सहज उपलब्ध असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत.
👉 पालघर जिल्हा पोलीस प्रशासन बॅन गुटख्यावर कधी मोठी कारवाई करणार?
👉 गुटखा माफियांना अभय देणारे कोण आहेत, याचाही तपास होणार का?
जनता आता केवळ कारवाईच्या बातम्या नव्हे, तर सातत्यपूर्ण आणि निर्णायक अंमलबजावणी पाहू इच्छित आहे.
✍️क्राईम डेस्क | पालघर नागरिक..



