श्रीराम मंदिर ट्रस्ट, पालघर समाजासाठी आदर्श पाऊल.

श्रीराम मंदिर ट्रस्ट, पालघर समाजासाठी आदर्श पाऊल.

 

श्रीराम मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित विवाह समारंभ आज अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील टोकरणपाडा येथील श्री अजय मेरे व कु. जीजू आडगा (आदिवासी/कोळी समाज) या नवदाम्पत्याचा विवाह दिनांक 25 जानेवारी 2026

दुपारी 12 वाजता श्रीराम मंदिर, पालघर येथे ट्रस्टच्या माध्यमातून पार पडला.

या पवित्र प्रसंगी नवरा-नवरीच्या भावी आयुष्यासाठी सुख, समाधान, आरोग्य आणि समृद्धी लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏

पालघर शहरात समाजहिताची आणि माणुसकीची जाणीव ठेवणारी एक अत्यंत सुंदर सुरुवात श्रीराम मंदिर ट्रस्टकडून झाली आहे. गरजू आणि गरीब कुटुंबातील मुला-मुलींच्या विवाहाची जबाबदारी उचलणे, त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था करणे तसेच आवश्यक वस्तू उपलब्ध करून देणे, हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी आहे.

अशा प्रकारची सामाजिक सेवा फक्त एका समाजापुरती मर्यादित न राहता सर्व समाजांमध्ये व्हावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. राम मंदिर ट्रस्टने घेतलेली ही पुढाकाराची भूमिका निश्चितच इतर संस्थांसाठी दिशादर्शक ठरेल.

 

या उपक्रमाबद्दल माझ्या वतीनेही श्रीराम मंदिर ट्रस्ट, पालघर यांना मनापासून अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा. समाजाला जोडणारी आणि गरजूंसाठी आधार बनणारी अशीच सेवा सातत्याने घडत राहो, हीच सदिच्छा.

— जावेद लुलानिया

संपादक – पालघर नागरिक

नवभारती शिव वाहतूक सेना – जिल्हाध्यक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *