☑️संडे स्पेशल | पालघर नगरपरिषद
निवडणुकीला महिने झाले… पण पालघर बदललं का?
पालघर | रविवार, ०१ फेब्रुवारी २०२६
पालघर नगरपरिषद निवडणुकीनंतर यंदा “पैशांची बरसात” झाल्याची चर्चा सर्वत्र झाली. निधी आला, आश्वासनं दिली गेली—पण आज प्रश्न असा आहे की जनतेच्या दैनंदिन आयुष्यात प्रत्यक्ष बदल दिसतोय का?
आजही पालघर शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. अनेक ठिकाणी रस्ते अपूर्ण, खड्ड्यांनी भरलेले आणि धुळीने त्रस्त आहेत. निवडणुकीनंतरही नवे रस्ते दिसत नाहीत, दुरुस्तीची कामे संथ आहेत.
कचऱ्याचं साम्राज्य शहरभर पसरलेलं आहे. नियमित साफसफाईचा अभाव, कचऱ्याचे ढिग आणि दुर्गंधी—यामुळे नागरिक हैराण आहेत. मच्छरांचा प्रचंड त्रास असून जागोजागी अस्वच्छता कायम आहे.
शहरातील फेरीवाल्यांचं अतिक्रमण हा मोठा प्रश्न बनला आहे. मुख्य रस्ते, चौक, पायवाटा—सर्वत्र अडथळे. त्यात भर म्हणून अवैध पार्किंगमुळे वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे पालघर नगरपरिषदच्या माननीय नगराध्यक्ष पालघर कचेरी रोडवर राहतात, तरीही याच रस्त्याची परिस्थिती अत्यंत खराब आहे. संपूर्ण रस्त्यावर अतिक्रमण, फेरीवाले आणि अवैध पार्किंग—हे वास्तव आजही बदललेलं नाही.
म्हणूनच थेट सवाल उपस्थित होतो— माननीय नगराध्यक्ष महोदया/महोदय, यावर तुम्ही उत्तर देणार का?
निधी असूनही कामे का दिसत नाहीत?
स्वच्छता, रस्ते आणि अतिक्रमणावर ठोस कारवाई कधी?
पालघरकर कर भरतात, मतदान करतात—आता सेवा मिळतेय की नाही, हे पाहण्याची वेळ आली आहे.
जनतेची सेवा झाली नाही, तर प्रश्न विचारलेच जाणार.
✍️ जावेद मजीद लुलनिया
संपादक – पालघर नागरिक.
भाजपा प्रणित नव भारतीय शिव वाहतूक संघटना
पालघर जिल्हा अध्यक्ष, पालघर.
NH-48 हायवे इन्फॉर्मेशन ग्रुप, पालघर..



