पालघर शहरात गर्दा, मटका, गांजा व गुटख्याची खुलेआम विक्री; पोलीस कारवाई फक्त कागदावर? थेट सवाल एसपींना.
पालघर (गांधीनगर):
पालघर शहरातील गांधीनगर परिसरात गर्दा, गांजा, गुटखा आणि मटका यांसारखे अवैध धंदे खुलेआम सुरू असल्याचे वास्तव समोर येत आहे. बंदी असतानाही दिवसाढवळ्या चालणारे हे समाजविघातक व्यवसाय युवकांचे भविष्य उद्ध्वस्त करत आहेत.
स्थानिक माहितीनुसार, गर्दा विक्री इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे की एका दिवसात 300 ते 400 लोक फक्त गर्दासाठी येथे येतात.
एवढ्या प्रमाणातील हालचाली प्रशासनाच्या नजरेआड कशा राहतात, असा थेट प्रश्न उपस्थित होत आहे.
यापूर्वी येथील नगरसेवकांनी ठोस कारवाई केली नाही त्यामागे नेमकं काय कारण होतं, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांकडे नागरिकांची स्पष्ट अपेक्षा आहे: आश्वासन नव्हे, प्रत्यक्ष आणि कायमस्वरूपी कारवाई.
परिसरात दोन व्यक्ती गावठी दारू मोठ्या प्रमाणात तयार करून खुलेआम विक्री करत असल्याचे आरोप आहेत.
कारवाईच्या नावाखाली केवळ दिखावा होत असल्याची भावना नागरिकांत आहे. पोलीस, रेल्वे पोलीस आणि इतर यंत्रणांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
✊ आता स्पष्ट इशारा जर पोलीस प्रशासनाने तात्काळ, प्रभावी कारवाई केली नाही, तर भाजपा प्रणित नव भारतीय शिव वाहतूक संघटना यांच्या वतीने जावेद मजीद लुलनिया, पालघर जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही व कायदेशीर मार्गाने पुढील आंदोलन, उपोषण, तक्रारी आणि न्यायालयीन पावले उचलली जातील.
उद्देश स्पष्ट आहे—गर्दा, गांजा, मटका आणि दारूचे अवैध जाळे कायद्याच्या चौकटीत बंद पाडणे आणि संबंधित विभागांची जबाबदारी निश्चित करणे.
या प्रक्रियेत पालघर पोलीस, रेल्वे पोलीस, पालघर कलेक्टर कार्यालय आणि पालघर नगरपरिषद यांचे लक्ष वेधून प्रशासनाची डोळे उघडणारी कायदेशीर कारवाई केली जाईल. हा लढा कुणाविरुद्ध नाही, तर तरुण पिढीच्या भविष्यासाठी आहे.
☑️ पालघर नागरिक | क्राईम डेस्क….



