ठळक बातम्या

“मोठे नाव, मोठे प्रकल्प… पण तपासणी कुठे?” पालघरमध्ये Fiya Construction च्या कामांवर वाढते प्रश्नचिन्ह

“मोठे नाव, मोठे प्रकल्प… पण तपासणी कुठे?” पालघरमध्ये Fiya Construction च्या कामांवर वाढते प्रश्नचिन्ह

दिनांक : 4 फेब्रुवारी 2026
Part-1 मध्ये बांधकाम क्षेत्रातील रॉयल्टी, RMC वापर व नियमपालनाबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर, आता Fiya Construction / Fiya Group च्या पालघर शहर व आसपासच्या भागात सुरू असलेल्या कामांच्या संख्येबाबतही गंभीर मुद्दे पुढे येत आहेत. नागरिकांमध्ये चर्चा आहे की पालघर शहराच्या हद्दीत Fiya Construction चे नेमके किती प्रकल्प सुरू आहेत, याची अधिकृत माहिती सार्वजनिक स्वरूपात उपलब्ध नाही.

 

यासोबतच ग्रामपंचायत हद्दीत देखील Fiya Construction कडून अनेक कामे सुरू असल्याचे बोलले जात आहे. नगरपरिषद व ग्रामपंचायत — या दोन वेगवेगळ्या यंत्रणांच्या हद्दीत काम करताना स्वतंत्र परवानग्या, नोंदणी, कर व रॉयल्टीचे नियम लागू होतात. मात्र प्रत्येक प्रकल्पासाठी त्या-त्या विभागांची परवानगी घेतली आहे का, आणि नियमांचे पालन प्रत्यक्षात होते का—याबाबत स्पष्टता नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पालघर शहरात Fiya Construction हे नाव आज मोठे व नामांकित बिल्डर म्हणून ओळखले जाते. मात्र याच नावाच्या प्रभावाचा दुरुपयोग तर होत नाही ना? “मोठे नाव” असल्यामुळे तपासणी, निरीक्षण व कारवाईकडे दुर्लक्ष केले जात आहे का—हा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे. नियम सर्वांसाठी समान असताना, कोणालाही विशेष सवलत मिळू नये, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, Fiya Construction च्या सर्व प्रकल्पांची एकत्रित (समेकित) तपासणी—ज्यात नगरपरिषद, ग्रामपंचायत, महसूल, लेबर व अग्निशमन विभागांचा समावेश असेल—अद्याप समोर आलेली नाही. इतक्या मोठ्या प्रमाणावर कामे सुरू असताना, सर्व प्रकल्पांची यादी, परवानग्या व तपासणी अहवाल सार्वजनिक करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
एकूणच, पालघर शहर व परिसरात सुरू असलेल्या या बांधकाम कामकाजाबाबत पारदर्शकता, नियमपालन व प्रशासनाची भूमिका यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. संबंधित विभागांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी व निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
क्रमश…

(Part-3 मध्ये कागदपत्रे, परवानग्या, तपासणी अहवाल आणि प्रशासनाची प्रत्यक्ष भूमिका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *