ठळक बातम्या

“खाऊ नको गुटखा… नाहीतर लागेल जीवाला झटका!”

“खाऊ नको गुटखा… नाहीतर लागेल जीवाला झटका!”

पालघर सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा रस्त्यावर उतरून इशारा अन्न व औषध विभागाची आणि प्रशासनाची गंभीर लापरवाही उघड.

दि:04.02.2026.
पालघर.
पालघर येथील पालघर सिव्हिल हॉस्पिटल मधील डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी व आरोग्य कर्मचारी यांनी आज गुटखा विरोधात जोरदार जनजागृती रॅली काढून संपूर्ण प्रशासनाचे लक्ष वेधले.


“खाऊ नको गुटखा, नाहीतर लागेल जीवाला झटका” असा स्पष्ट संदेश देत डॉक्टरांनी गुटखा हे थेट मृत्यूकडे नेणारे व्यसन असल्याचा इशारा दिला.
या रॅलीमधून डॉक्टरांनी थेट अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि संपूर्ण प्रशासनाच्या लापरवाहीवर बोट ठेवले.
महाराष्ट्रात गुटखा पूर्णपणे बंदी असताना देखील पालघर जिल्ह्यात गुटखा खुलेआम, धडाक्याने विकला जातो, ही बाब प्रशासनाच्या अपयशाचे जिवंत उदाहरण असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.


बंदी फक्त कागदावर आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला.
डॉक्टरांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या कॅन्सर रुग्णांपैकी मोठ्या प्रमाणात रुग्ण गुटखा व तंबाखू सेवनामुळे आजारी पडलेले आहेत.
“गुटखा खाल्ला तर कॅन्सर होणार नाही का?” हा प्रश्नच चुकीचा असून,
“कॅन्सर कधी होणार?” हा खरा प्रश्न आहे, असा धक्कादायक पण सत्य इशारा डॉक्टरांनी दिला.

आज रुग्णांचे प्राण वाचवणारे डॉक्टर स्वतः रस्त्यावर उतरून समाजाला आणि प्रशासनाला आरसा दाखवत आहेत, हे अत्यंत गंभीर आहे.
जर प्रशासन वेळेत जागं झालं नाही, तर आज गुटखा विकणारे उद्या हॉस्पिटल्स कॅन्सर रुग्णांनी भरून टाकतील, आणि त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.


👮‍♂️ थेट आवाहन पोलीस अधीक्षकांना
या रॅलीतून माननीय यतीश देशमुख यांना थेट संदेश देण्यात आला आहे —
👉 “साहेब, हे थांबवण्याची ताकद तुमच्याकडे आहे.”
👉 पालघरची जनता तुमच्याकडे आशा आणि विश्वासाने पाहते.
👉 जर कठोर कारवाई झाली, तर गुटखा माफिया संपुष्टात येऊ शकतो.

या रॅलीचे फोटो व व्हिडिओ उपलब्ध असून, डॉक्टरांचा हा आवाज आता संपूर्ण पालघर जिल्ह्यात दुमदुमत आहे.,
✍️
— पालघर नागरिक | आरोग्य व क्राईम डेस्क..
जावेद लुलानिया. पालघर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *