ठळक बातम्या

पत्रकार जावेद लुलानिया यांना थेट नाव घेऊन जीवे मारण्याची धमकी…

पत्रकार जावेद लुलानिया यांना थेट नाव घेऊन जीवे मारण्याची धमकी…

तक्रार देऊनही अपेक्षित नोंद नाही; पोलिसांवर गंभीर प्रश्न…

दिनांक : 06 फेब्रुवारी 2026 | पालघर

पालघर येथील पत्रकार व समाजसेवक तसेच ओवेज चिकन शॉपचे मालक जावेद मजीद लुलानिया यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही जावेद लुलानिया यांच्यावर गोळीबार करून जीवघेणा हल्ला झाला होता, मात्र त्या प्रकरणातील आरोपी अद्याप पकडले गेलेले नाहीत. अशा पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा थेट नाव घेऊन धमक्या दिल्याने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास एक सफेद रंगाची सफारी/फॉर्च्युनर कार MH 12 .. 7799 ओवेज चिकन शॉपच्या बाहेर येऊन थांबली.


फोटो व व्हिडिओ बनवायला लागले.. या गाडीत तीन व्यक्ती होत्या. दुकानात काम करणाऱ्या सद्दाम याला उद्देशून त्यांनी अश्लील शिवीगाळ करत “जावेद बडवा कुठे आहे, त्याला आम्ही सोडणार नाही” अशी थेट धमकी दिली. याच गाडीतल्या एका व्यक्तीच्या कमरेला रिव्हॉल्वर (हत्यार) असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाहिले. दुकानाबाहेर व्यवसाय करणाऱ्या बिर्याणी विक्रेत्यालाही धमकी देण्यात आली.


या गंभीर घटनेनंतर जावेद लुलानिया यांनी दिवसा दोन वेळा 112 क्रमांकावर फोन करून पोलिस मदत मागितली. पोलिस स्टेशनमध्ये प्रत्यक्ष जाऊन तक्रार देण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र, ज्या स्वरूपात व ज्या गंभीरतेने तक्रार नोंदवणे आवश्यक होते, त्या पद्धतीने तक्रार घेतली गेली नाही, असा थेट आरोप जावेद लुलानिया यांनी केला आहे. यासंदर्भात पोलिस स्टेशनमधील फोन कॉलचे फोटो, उपस्थितीचे पुरावे व इतर छायाचित्रे त्यांच्या जवळ उपलब्ध आहेत.

आपल्या जीवाला धोका असल्याचे स्पष्टपणे सांगूनही अपेक्षित कारवाई होत नसल्यामुळेच हा संपूर्ण प्रकार आता जावेद लुलानिया यांनी न्यूजच्या माध्यमातून समोर आणला आहे. यामुळे “पत्रकार, समाजसेवक असूनही जर अशी अवस्था असेल, तर सामान्य नागरिकांचे काय?” असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. हे प्रकरण आता थेट पालघर पोलीस प्रशासन व माननीय पोलीस अधीक्षकयतीश देशमुख यांच्या निदर्शनास आणण्यात आले असून, पोलिस प्रशासन यावर नेमकी काय ठोसh आणि तात्काळ कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *