ठळक बातम्या

धमक्यानंतरही तिसरा दिवस पोलीस कारवाई शून्य; पत्रकार जावेद लुलानिया धोक्यात.

07.02.2026.
पत्रकार व समाजसेवक जावेद मजीद लुलानिया यांना थेट धमक्या देऊन आज तिसरा दिवस उलटला असतानाही पोलीस विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्युनर गाडीतून आलेल्या व्यक्तींनी नाव घेऊन धमक्या दिल्या, कर्मचाऱ्यांना व परिसरातील व्यावसायिकांना घाबरवले, तसेच हत्यार (रिव्हॉल्वर) दिसल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला—असे असतानाही तपासाची गती अत्यंत संथ आहे.

या प्रकरणात 112 वर कॉल, पोलीस स्टेशनमध्ये प्रत्यक्ष भेटी आणि तक्रार देण्याचे प्रयत्न झाले आहेत. तरीही CCTV फुटेज तातडीने सील करणे, वाहनाची संपूर्ण मूव्हमेंट ट्रॅक करणे आणि संशयितांची ओळख पटवणे या प्राथमिक पावलांबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. विशेष म्हणजे, लुलानिया यांच्यावर पूर्वीही जीवघेणा हल्ला झाला होता, ज्यातील आरोपी आजतागायत पकडले गेलेले नाहीत—यामुळे सध्याचा धोका अधिक गंभीर ठरतो.

या पार्श्वभूमीवर आता या प्रकरणाची तपासणी माननीय पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी थेट लोकल क्राइम ब्रांच (LCB) कडे देणे अत्यावश्यक असल्याची मागणी पुढे येत आहे. LCBकडून स्वतंत्र व तांत्रिक तपास झाल्यासच फॉर्च्युनर वाहनाची संपूर्ण मूव्हमेंट, संपर्कसाखळी आणि धमकीमागील कट उघड होऊ शकतो, असे मत व्यक्त केले जात आहे.

सध्या तपासातील विलंब पाहता “या प्रकरणात केवळ बाहेरील गुंडांचा हात आहे की पोलीस यंत्रणेतच काही षडयंत्र/दुर्लक्ष आहे?” असा थेट सवाल उपस्थित होत आहे. पोलीस निरीक्षक आनंद पराड, उपविभागीय पोलीस अधिकारी नाईक आणि पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्याकडून LCB चौकशीचे आदेश, वेळबद्ध कारवाई आणि पारदर्शक अहवाल अपेक्षित असल्याचे नमूद केले जात आहे. कायद्याचे संरक्षण आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेची हमी मिळेपर्यंत हा मुद्दा थांबणार नाही, अशी भूमिका लुलानिया यांनी मांडली आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *