ठळक बातम्या

“जिहादी” वक्तव्य प्रकरणी कारवाईची मागणी; पुरावे पोलिसांकडे सादर..

“जिहादी” वक्तव्य प्रकरणी कारवाईची मागणी; पुरावे पोलिसांकडे सादर..

दिनांक : 18/02/2026 |
पालघर प्रतिनिधी..


सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये “जिहादी” असा शब्द वापरण्यात आल्याने पालघरमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणी पालघर पोलीस स्टेशन व डीवायएसपी कार्यालयात लेखी निवेदन देऊन तात्काळ गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे.


तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्यक्तीविरोधात पूर्वीही गुन्हा नोंद असल्याचे नमूद करण्यात आले असून, समाजातून त्यांचा बहिष्कार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तरीदेखील वारंवार भडकावू वक्तव्ये करून धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

व्हिडिओ, फेसबुक पोस्ट, व्हॉट्सअ‍ॅप संदेश व कमेंट्सचे स्क्रीनशॉट्स अर्जासोबत पोलिसांकडे सादर करण्यात आले आहेत. या पोस्टमुळे समाजात अफवा आणि तणावाचे वातावरण निर्माण झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.

तक्रारदारांनी प्रशासनाकडे विनंती केली आहे की, संबंधित प्रकरणात कायदेशीर तरतुदीनुसार तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा लोकशाही मार्गाने पुढील आंदोलनात्मक भूमिका, जसे की शांततापूर्ण आंदोलन किंवा उपोषण, यावर विचार करण्यात येईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सामाजिक सलोखा अबाधित ठेवणे ही प्रशासनाची व नागरिकांची संयुक्त जबाबदारी असून, तातडीने योग्य निर्णय घेण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

जावेद मजीद लुलानिया..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *