जातीय तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नाविरोधात पालघरात संताप – दोषींवर त्वरित कारवाईची मागणी

जातीय तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नाविरोधात पालघरात संताप – दोषींवर त्वरित कारवाईची मागणी

दि. 13 फेब्रुवारी रोजी पालघर शहरात मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी जमवून सार्वजनिकरीत्या भडकाव स्वरूपाची वक्तव्ये करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित वक्तव्यांमुळे जातीय व धार्मिक तणाव निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली असून सोशल मीडियावरूनही हिंसात्मक प्रतिक्रिया व धमक्यांचा प्रसार झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणात एकता सामाजिक संस्था व अंजुमन सामाजिक संस्था यांनी अधिकृत निवेदन देत संबंधित दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीच्या भूमिकेला दोन्ही संस्थांनी पाठिंबा दर्शविला असून, सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी कठोर कारवाई आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.

सदर घटनेचे व्हिडिओ, सोशल मीडिया पोस्ट व स्क्रीनशॉट्सचे पुरावे पोलिस प्रशासनाकडे सादर करण्यात आलेले आहेत. तरीदेखील अद्याप गुन्हा दाखल करण्यात विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. सध्या पवित्र रमजान महिना सुरू असून अशा संवेदनशील काळात कोणताही तणाव वाढू नये यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
पालघर जिल्ह्यातील इतर संस्था, मस्जिद व मंदिर ट्रस्ट यांच्याकडूनही या मागणीस लवकरच पाठिंबा मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दोषींवर योग्य कायदेशीर कारवाई करून शहरात शांतता व कायदा-सुव्यवस्था कायम ठेवावी, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

 

महाराष्ट्राच्या निर्भीड, वास्तव, सडेतोड बातम्या फक्त आपल्या पालघर नागरिक पोर्टल वर मुख्य संपादक:- ✒जावेद लुलानिया

पालघर नागरिक ला आवश्यक भेट द्या आणि राह अपडेट
जाहिराती साठी संपर्क करा.

Editor- Javed Lulania
Contact Number- 88062 47860

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *