आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी समुद्रकिनारी लुटला वॉटर सर्फिंगचा आनंद

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी समुद्रकिनारी लुटला वॉटर सर्फिंगचा आनंद

पालघर 

डहाणू प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांच्या नाविन्यपुर्ण संकल्पतेतुन डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत शासकिय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी मुंबई सर्फ कल्ब स्कुल यांच्या पुढाकारातुन वसई समुद्रकिनारी वॉटर सर्फिंगचा रोमांचक आंनद लुटला. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस एक विशेष आणि अविस्मरणीय अनुभव ठरलेला होता. विद्यार्थ्यांनी प्रथमच वॉटर सर्फिंग या जलक्रीडा प्रकारचा रोमांचक अनुभव घेतला. या नाविन्यपुर्ण उपक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने, राज्यस्तरावरच्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवुन आपल्या खेळाचे उत्तम सादरीकरण करावे. यासाठी करण्यात आले

या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षित मार्गदर्शकांच्या देखरेखीखाली वॉटर सर्फिंगचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले तसेच सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सहभाग घेण्याची संधी देण्यात आली. सुरुवातीला काही विद्यार्थ्यांना भीती वाटत असली तरी तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी आत्मविश्वासाने हा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांनी पुढील महिन्यात होणा-या स्पर्धेसाठी सदभागी होण्याच्यी इच्छा व्यक्त केली. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यासाठी हि आनंदाची पर्वणीच ठरली.

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, उत्साह आणि समाधान पाहण्यासारखे होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये साहसाची भावना, आत्मविश्वास आणि नवीन गोष्टी शिकण्याची प्रेरणा निर्माण झाली आहे.आश्रमशाळेतील अनेक मुलं ही अंत्यत प्रतिकुल परिस्थितीतून आलेली आहेत. त्यांच्या आयुष्यात अशा प्रकारच्या संधी खूपच मर्यादित असतात. आज जेव्हा त्यांनी पहिल्यांदाच पाण्यावर उभं राहून वॉटर सर्फिंग केलं, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद, आश्चर्य आणि आत्मविश्वास पाहून आनंद वाटला. हा फक्त एक उपक्रम नव्हता, तर त्यांच्या स्वप्नांना पंख देणारी एक छोटी सुरुवात असल्याचा. विश्वास प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांनी व्यक्त केला

“वॉटर सर्फिंग हा माझ्यासाठी पूर्णपणे नवीन अनुभव होता. सुरुवातीला थोडी भीती वाटली, पण एकदा सर्फिंग सुरू केल्यावर खूप मजा आली. या उपक्रमामुळे माझा आत्मविश्वास वाढला.” रोशन हरपाले या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

“वॉटर सर्किंगचा अनुभव माझ्यासाठी खूप नवीन आणि रोमांचक होता. सुरुवातीला मला थोडी भीती वाटत होती, पण प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे माझा आत्मविश्वास वाढला. पाण्यावर सर्फिंग करताना खूप आनंद झाला. अशा उपक्रमांमुळे आम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि धाडस करण्याची प्रेरणा मिळते. भविष्यातही असे उपक्रम व्हावेत, अशी माझी इच्छा आहे.” ,नंदिनी चव्हाण या विद्यार्थिनीचे मनोगत

“सुरुवातीला काही मुलं भीतीने मागे सरकत होती पण थोड्या वेळातच तीच मुलं धाडसाने पुढे येऊन पाण्यावर सर्फिंग करताना पाहिली, तेव्हा मन भरून आलं. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद, आम्हीही करू शकतो ही भावना हे पाहणं आमच्यासाठी अविस्मरणीय होतं. त्या क्षणी जाणवलं, की अशा छोट्या संधीच त्यांच्या आयुष्यात खुप मोठा बदल घडवू शकतात. प्रशिक्षक म्हणून तो क्षण आमच्यासाठी खूप खास आणि भावनिक होता.” प्रिती रावत, संचालक मुंबई सर्फ क्लब ऍन्ड स्कुल, विरार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *