पालघरमध्ये भरदिवसा रस्त्यावर दहशत; कार अडवून काचा फोडल्या, चालकावर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न.

पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज

20 एप्रिल 2026..

पालघरमध्ये रस्त्यावर दहशत; कार अडवून काचा फोडल्या, चालकावर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न.

पालघर | प्रतिनिधी जावेद लुलानिया.

पालघरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे भर रस्त्यात कार अडवून काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची माहिती आहे. विरेंद्र नगर येथील विजय रघुनाथ जाधव हे 19/04/2026 रोजी मसरोलीहून केवकडे पालघर रोडने जात असताना, त्यांच्या गाडीसमोर एक पांढऱ्या रंगाची नंबर प्लेट नसलेली स्विफ्ट कार आडवी उभी करण्यात आली.

माहितीनुसार, त्या कारमधून उतरलेल्या 3 ते 4 जणांनी बेसबॉल बॅट आणि हॉकी स्टिकच्या सहाय्याने विजय जाधव यांच्या गाडीवर हल्ला केला. गाडीच्या चारही बाजूंनी काचा फोडण्यात आल्या आणि चालकावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत गाडीचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने विजय जाधव हे थोडक्यात बचावले.

पीडितांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात एका संशयित आरोपीचे नाव पुढे येत असून त्याची ओळख पृथ्वी कमलाकर मराठे (शिव रुद्र ढोल ताशा पथक अध्यक्ष) अशी सांगितली जात आहे.

या घटनेमुळे पालघरमधील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भरदिवसा अशा प्रकारचा हल्ला होणे ही चिंतेची बाब असून पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. आता पोलिस या प्रकरणात किती वेगाने कारवाई करतात आणि आरोपींना कधी अटक करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *