पालघर नागरिक न्यूज
✍ प्रतिनिधी – अशरफ खान. पालघर
१९ ऑगस्ट २०२५
पालघर चाररस्त्यावर अपघात – रस्त्याच्या खड्ड्यामुळे युवक आणि युवती जखमी
स्थान: चाररस्ता, छत्रपती शिवाजी चौक, पालघर
आज संध्याकाळी फक्त २० मिनिटांत दोन अपघात घडले:
सायं. ४:०० वाजता – एक युवक बाइकवरून रस्त्याच्या खड्ड्यात अडकून पडला.
सायं. ४:२० वाजता – एक युवती स्कूटीवरून घसरली आणि जखमी झाली.
नागरिकांचा संताप:
“हा खड्डा कोणाचंही जीव घेऊ शकतो. नगर परिषद आणि PWD गाढ झोपेत आहेत.”
जबाबदार विभाग:
अनेक तक्रारी असूनही अद्याप रस्त्याची दुरुस्ती झाली नाही.
प्रशासनाला प्रश्न:
हा रस्ता नागरिकांसाठी धोकादायक आहे, प्रशासन मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का



