विश्वासघात की राजकारण? शिंदे गटाचे सरपंच आता भाजपात प्रवेशाच्या तयारीत!
प्रतिक मयेकर
📍बोईसर
बोईसर, गावकऱ्यांनी प्रचंड विश्वासाने निवडून दिलेल्या शिंदे गटाच्या सरपंचाने आता अचानक भाजपाच्या दारी धाव घेतल्याची माहिती पुढे येत आहे. ज्याच पक्षाने ग्रामपंचायत निवडणुकीत तिकीट दिलं, ज्याच कार्यकर्त्यांनी जीव तोडून प्रचार केला, आणि ज्याच नागरिकांनी विश्वासाने मतपेटीत बोट ठेवून विजय मिळवून दिला – त्याच नागरिकांच्या विश्वासाला तडा देत सरपंच भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे.
गावकऱ्यांमध्ये या हालचालीमुळे प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. “आम्ही शिंदे गटावर विश्वास ठेवला, आमचा मोलाचा मताधिकार वापरला. पण आता निवडून आल्यावर सरपंचांनी भाजपात जाणं म्हणजे आमच्याशी विश्वासघातच आहे,” अशा शब्दांत ग्रामस्थ रोष व्यक्त करत आहेत.
निवडणुकीत पक्षाशी निष्ठा दाखवण्याची शपथ घेणारे नेते निवडून आल्यावरच आपलं राजकीय गणित जुळवण्यासाठी भाजपाच्या गळाला लागतात, हे लोकशाहीच्या आरशातला एक मोठा काळा डाग असल्याचे मत राजकीय वर्तुळातूनही व्यक्त केले जात आहे.
खास करून ग्रामपातळीवर निवडणूक लढताना उमेदवार नागरिकांना विकास, कामं, आणि पारदर्शक कारभाराचं आश्वासन देतात. मात्र सत्तेच्या हव्यासापोटी मध्यावधीमध्ये पक्षांतर करणं हे सरळसरळ जनादेशाचा अपमान असून गावकऱ्यांच्या भावनांची पायमल्ली करणं आहे.
आता नागरिकांचा प्रश्न एकच –“आम्ही मत दिलं होतं गावाच्या विकासाला की नेत्याच्या स्वार्थाला?



