दहानूतील सावटा गावात ३ ते ५ फुट पाणी भरलं

* ब्रेकिंग न्यूज – दहानूतील सावटा गावात ३ ते ५ फुट पाणी भरलं
दानू. सनान शेख.
दहानू तालुक्यातील सावटा गावात मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अविरत पावसामुळे आणि सखरा धरणाचे दरवाजे उघडल्याने गावात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गावात अंदाजे ३ ते ५ फुट पाणी साचले असून अनेक घरं, रस्ते आणि गल्ल्या पूर्णपणे जलमय झाल्या आहेत. वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे, तर नागरिकांना देखील प्रचंड अडचणींना सामोरं जावं लागत आहे.

स्थानिक प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले असून, गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. पावसाचा जोर अद्याप कायम असल्याने परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *