संकटाने खचलेल्या वाणगाव, चिंचणीमधील पूरग्रस्त कुटुंबांना धीरआमदार राजेंद्र गावित यांची जनतेप्रती संवेदनशील बांधिलकी
पालघर, प्रतिनिधी :जावेद लुलानिया.
पालघर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली असून, शेकडो कुटुंबांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा संकटाच्या काळात स्वतःचा वाढदिवस साजरा करण्याऐवजी पूरग्रस्तांच्या मदतीला धाव घेण्याचा निर्णय घेत पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांनी सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श घालून दिला.
२४ जुलै रोजी वाढदिवस असतानाही त्याआधीच २३ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसानंतर त्यांनी चिंचणी आणि वाणगाव परिसरात प्रत्यक्ष भेट देत पूरग्रस्त नागरिकांची विचारपूस केली. संकटाने खचलेल्या कुटुंबांना धीर देत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि प्रशासनाला तातडीने मदतकार्य गतीने राबविण्याच्या सूचना दिल्या. सुरक्षित निवारा, अन्नधान्य, आरोग्य सेवा तसेच नुकसानभरपाईची प्रक्रिया जलद पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला.
“पूरग्रस्तांच्या पाठीशी राहणे हे माझे परमकर्तव्य आहे. जनतेवर संकट आले असताना वाढदिवसाचा उत्सव साजरा करण्यापेक्षा त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणे अधिक महत्त्वाचे आहे,” अशी भावना आमदार गावित यांनी व्यक्त केली.



याचवेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी असलेली अतिक्रमित घरे नियमित करून पात्र लाभार्थ्यांना हक्काची घरे उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमालाही प्राधान्य दिले. विविध शासकीय योजनांमधील लाभार्थ्यांच्या घरमंजुरीची प्रक्रिया पूर्ण करून प्रत्येक गरजवंताला स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले.”माझ्यासाठी वाढदिवसाचा खरा आनंद हा जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि त्यांच्या आयुष्यात निर्माण झालेला विश्वास आहे. पूरग्रस्तांना दिलासा देणे आणि गरजूंना हक्काचे घर मिळवून देणे, हीच माझ्यासाठी सर्वोत्तम वाढदिवसाची भेट आहे,” असेही त्यांनी नमूद केले.


वैयक्तिक आनंदापेक्षा जनतेचे दुःख अधिक महत्त्वाचे मानत संकटाच्या क्षणी नागरिकांच्या सोबत उभे राहण्याचा आमदार राजेंद्र गावित यांचा निर्णय सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला आहे. पूरग्रस्तांना दिलेला आधार, प्रशासनाला दिलेल्या स्पष्ट सूचना आणि समाजाप्रती जपलेली बांधिलकी यामुळे नागरिकांसह कार्यकर्त्यांनी त्यांच्या या संवेदनशील भूमिकेचे मनापासून स्वागत केले.ह्या वेळी त्याच्या समवेत पालघर नगराध्यक्ष उत्तम घरत, उप नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, सर्व नगरसेवक तसेच मा. जि प सदस्य देवानंद शिंगाडा
सरपंच मेघा शिंगाडा
ग्रा प सदस्य प्रति गावाणकर
ग्रा पं सदस्य प्रमोद भुतकडे
युवा लोकसभा अध्यक्ष चेतन धानमेहेर
जेष्ठ कार्यकर्ते रमेश वझे
मंडळ अधिकरी अनंत शेजल
तलाठी अक्षय रामपूर

पोलीस निरीक्षक सातपुते इ. अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.



