मोखाडा पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक.   

    मोखाडा पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक.                     दिनांक 24/08/2026

    मोखाडा प्रतिनिधी :: समीर शेख 

     

    मोखाडा : पैगंबर हजरत मोहम्मद सल्लल्लाहो अलैहि वसल्लम 26/8/2026, वार , बुधवार यांच्या जयंतीनिमित्त मोखाडा पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली.

    यावेळी आगामी जयंती उत्सव शांततेत, सलोख्याने आणि सामाजिक एकोपा कायम ठेवून साजरा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मुस्लिम समाजातील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.या बैठकीस मुस्लिम समाजातील जमशिद शेख, बशीर मामू, आरीफ शेख, फारूक पिंजारी, परवेज शेख, मुजीब मनीयार,इम्रान मनियार आणि समीर शेख यांच्यासह शांतता समितीचे सदस्य व संबंधित नागरिक उपस्थित होते.बैठकीदरम्यान मोखाड्यातील सामाजिक सलोखा, शांतता आणि बंधुभाव कायम ठेवण्याचा निर्धार करण्यात आला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *